24 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home विदर्भ वीज पडून एकाचा मृत्यू ,आंजी आंदोरी येथे 61 मेंढ्याचा मृत्यू

वीज पडून एकाचा मृत्यू ,आंजी आंदोरी येथे 61 मेंढ्याचा मृत्यू

0
22
अवकाळी पावसाने 341 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान
वाशिम दि.28- वाशिम तालुक्यातील कोंढाळा (झामरे) येथील ज्ञानेश्वर इंगोले (वय 28) या युवकाचा आज 27 एप्रिल रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला.जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 341.84 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मानोरा तालुक्यात झाले असून या तालुक्यात 270 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 12.9 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मानोरा तालुक्यात वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला. कारंजा आणि मानोरा तालुक्यात अनुक्रमे 12 आणि 10 अशी एकूण 22 घरांची पडझड झाली.
      अवकाळी पाऊस व गारपिटीने रिसोड तालुक्यात 19 हेक्टरवरील कांदा पिकाचे, मालेगाव तालुक्यात 2 हेक्टरवरील आंबा आणि कांदा बी चे, मंगरूळपीर तालुक्यात 20 हेक्‍टरवरील भाजीपाला, लिंबू व कांदा बी,कारंजा तालुक्यात 30.80 हेक्टरवरील पपई, कांदा,ज्वारी, संत्रा, मूग, भाजीपाला,बरबटी, पेरू, गहू व तीळ पिकाचे आणि मानोरा तालुक्यात 270 हेक्टरमधील शेत पीक व फळ पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

गारपीटचा पशुधनाला मोठा फटका 

देवळी तालुक्यातील आंजी आंदोरी येथे 61 मेंढ्याचा मृत्यू

वर्धा – वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील आंजी आंदोरी येथे शेतात चराईसाठी बसविलेल्या मेंढ्याचा अवकाळी पावसात झालेल्या गारपीटीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्याला वादळासह गरपिटाचा चांगलाच तडाखा बसला आहे. यात आंजी आंदोरी येथील शेतकरी राजू डगवार यांच्या शेतीमधील 61 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. मेंढ्यांच्या मृत्यूमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळम परिसरातील मेंढपाळाने आपल्या मेंढ्या चाराईसाठी शेतकऱ्याच्या शेतात ठेवल्या होत्या. अचानक अवकाळी पाऊस बरसला. गार पडली यात 61 मेंढ्याचा मृत्य झाला आहे. पशु संवर्धन विभागाने याची दखल घेत मेंढ्याचे शव विच्छेदन केले आहे.