गडचिरोली-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील करोडो रूपयांची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणार्या अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत तक्रार पत्र निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयास ८ डिसेंबर २0२२ अन्वये प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाने २२ डिसेंबर २0२२ चे आदेशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) रवींद्र करणे यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने २४ फेब्रुवारी २0२३ अन्वये चौकयशी अहवाल सादर केला होता.
या प्राप्त चौकशी अहवालामध्ये भामरागड येथील गट विकास अधिकारी, शाखा अभियंता, सहायक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) व ६ ग्रामसेवक आदी प्रथम दर्शनी दोषी आढळून आल्याने विशाल एस. चिडे ग्रापं मóोराजाराम, सुनील व्ही. जट्टीवार ग्रापं बोटनफुंडी या दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले. तर ६ ग्रामसेवक व शाखा अभियंता यांचेवर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच गटविकास अधिकारी यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याकरिता विभागीय चौकशी प्रस्ताव शासनाकडे जोडपत्र १ ते ४ मध्ये सादर करण्यात आली आहे. तांत्रीक सहायक (टीपीओ) यांना काढून टाकण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच अहेरी येथील लोमेश यादवराव सिडाम ग्रापं उमानुर हे ग्रामसेवक पथम दर्शनी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पंचायत समिती मुलचेरा व अहेरी येथील तक्रारी संबंधाने तांत्रीक बाबीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांचेकडून पूरक चौकशी करण्यात येणार आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे सीईओ कुमार आशिर्वाद यांनी म्हटले आहे.





