कंत्राटी नर्सेस संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

0
48

गोदिया,दि.17ः महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग कंत्राटी नर्सेस यूनियन आयटक महाराष्ट्रच्या अव्हानावर आज १७ मे रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्य़ातील कंत्राटी नर्सेस यांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष हौसलाल रहांगडाले,जिल्हा सचिव स्वप्नाली ठवकर,कोषाध्यक्ष बबीता रहांगडाले, भुमेश्वरी येरणे, माधुरी बंन्सोड, मिना पेंदाम,अर्चना चौधरी,हेमलता कटरे, राखीप्रसाद कल्याणी चौधरी, मंजू बिलोने, प्रमिला कटरे, ईश्वरी रहांगडाले, आयटक जिल्हा सचिव रामचंद्र पाटिल यांनी केले.आंदोलन कंत्राटी एएनएम जीएनएम यांना शासनाच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे, या उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिटाचे आदेश २० जून 2022 आणि आरोग्य मंत्री यांच्या कक्षात २० मार्च २०२३ ला झालेल्या बैठकीतील निर्णयावर त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावे याकरीता करण्यात आले होते.आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.