37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश – नागरे पाटील

जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश – नागरे पाटील

0
31

blank

अर्जूनी मोरगाव –जेवढा मोठा संघर्ष तेवढे यशही मोठे असते.आयुष्यात कष्टामुळे परिवर्तन होईल.उज्ज्वल भविष्यासाठी एेन तारण्यात ध्येय निश्चित करून त्या दिशेने अथक परिश्रमाने वाटचाल केल्यास यश निश्चित आहे.अपयशाने खचून न जाता प्रयत्नरत राहा,आणि यशस्वी जीवनाच्या लाटेवर स्वार व्हा, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.
राजकुमार बडोले तथा युथ प्रतिष्ठानतर्फे सरस्वती विद्यालय येथे (ता.०५) रोजी आयोजिलेल्या  प्रेरणात्मक  व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे संयोजक राजकुमार बडोले  यांनी श्री. नांगरे-पाटील यांचे स्वागत केले. बडोले यांनी  यांनी प्रास्ताविकात सामाजिक न्याय मंत्री असतांना युकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
श्री. नांगरे-पाटील म्हणाले, की छत्रपती शिवरायांनी बालवयात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला अन् मोठ्या प्रयत्नांनी तो यशस्वी केला. अभ्यासपूर्ण नियोजन अन् त्यादृष्टीने टाकलेल्या पावलांमुळे महाराज यशस्वी झाले. त्याचबरोबर प्रजेबद्दलचे प्रेम, त्यांना केलेली मदत अन् त्यांची केलेली सेवा, हीच महाराजांच्या यशाची अन् पराक्रमाची शिदोरी असल्याचे सांगितले.blank
 *विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला* 
 प्रेरणात्मक व्याख्यान दरम्यान विश्वास नागरे पाटलांनी जमलेल्या युवकांना यशवंत होण्याचा सक्सेस पासवर्ड सांगितला यशस्वी व्हायचं असेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी मनातून नकारात्मक गोष्टी बाहेर काढाव्या 0 तास टाईमपाससाठी असावेत, इंटरनेट मोबाईलसाठी झिरो तास ठेवा अभ्यासासोबतच दररोज एक तास व्यायाम करा आणि कामासाठी किमान आठ तास द्या मग ते काम असो वा अभ्यास दररोज नऊ मिनिटे मेडिटेशन करा जेणेकरून लक्ष केंद्रित व्हायला अधिक मदत होईल स्वतःला शिस्त लावून घ्या भरपूर मेहनत करा हे मोलाचे सल्ले आत्मसात केल्यास यशाचे शिखर नक्की दूर नसेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
व्यवसाय असो नौकरी असो अथवा ईतर काही मेहनत मेहनत आणि मेहनत करूनच यश मिळतो बुवाकडे जाऊन आपला मंगल बघण्यापेक्षा आपल मनगट मजबूत करा अपयशाने हुरळून जायचं नाही जो पर्यंत यशस्वी होत नाही तो पर्यंत मैदान सोडायचं नाही. आणि मि हेच केल मिळालेल्या यशाने माझे मित्र मला म्हणायचे आता तुला माधुरी दिक्षित पन नाकारणार नाही.
त्यामुळे आधी करिअर घडवा असे आवाहन विश्वास नागरे पाटलांनी जमलेल्या तरुणांना २  माईकचा ताबा घेत,आपल्या आयुष्याचा प्रवास सांगितला हे सांगताना पदोपदी सुविचारांची, शेरोशायरीची पखरण केली यावेळी अर्जुनीकरांनी दिलेला प्रतिसाद अप्रतिम होता.
 *गुणवंतांचा सत्कार* 
तालुक्यातील सुरबन /बोंडगाव येथील रहिवासी असेलेला अमित उंदिरवाडे याने नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेत ५८१ रैंक मिळवली सोबतच हेमंत सुटे यांनी मोठ्या प्रमाणात एअर होस्टेसणा प्रशिक्षित करून योगदान दिल यावेळी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या काजळ रुखमोडे,ईतर गुणवंत धीरज भिवघडे,पर्व रामटेके मीनाक्षी कोसरकर इशिता उंदिरवाडे हिमांशी करंजेकर प्रेरणा हसीजा हितेश्वरी शहारे आचल गुप्ता यशपाल गोंडाणे यांचा सत्कार करण्यात आला.
  *‘’त्या’ दिव्यांगाच्या प्रेमाने भारावले नागरे पाटील …* 
विश्वास नागरे पाटील यांचा चाहता वर्ग महाष्ट्रातच नाही तर अवघ्या देशात आहे. आपला हिरो आपल्या परिसरात आल्याची बातमी काळातच त्याच्यासाठी काही द्यायचं म्हणून अनेकांनी गिफ्ट दिल त्यात अशाच एका चाहत्याने स्वःता बनवलेली पेंटिंग गिफ्ट केली.त्यांचा तो चाहता अंपग होता त्याने दिलेलं गिफ्ट हे बघून नागरे पाटील अधिकच भारावले होते.हा प्रसंग बघून उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाटासह प्रतिसाद दिला.

blank