
गोंदियात सर्वांगीण बाल सुसंस्कार 3 दिवसीय प्रशिक्षण शिबीराचं उदघाट्न थाटात
गोंदिया ता.9 जुन :-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेला समता सैनिक दल अजूनही जिवंत आहे. समता सैनिक दलाची वर्दी अजूनही आंबेडकरी बाणा बोलते, अन्यायावीरुद्ध लढण्यासाठी समता सैनिक दलाची निर्मिती झाली असून गावागावात समता सैनिक दल निर्माण करण्यात यावा असा सूर उदघाटना प्रसंगी निघाला.पिंडकेपार येथील संताजी सभागृहात 3 दिवसीय सर्वांगीण बाल सुसंस्कार प्रशिक्षण शिबीराचं’ आज (ता.9) थाटात उदघाटन झालं.
मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे,नॅशनल स्टाफ ऑफिसर गजेंद्र गजभिये, गोंदिया जिल्हा प्रमुख डॉ अजय अंबादे,
जिल्हा समता सैनिक दलाच्या कमांडर किरण वासनिक,भंडाऱ्याचे विलास नागदेवे,गोंदिया शहरचे सी.पी.बिसेन, वसंत गवली, सुधीर भिमटे,डॉ.शामिना खान मॅडम, लक्ष्मी राऊत, आदेश गणवीर आदि मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम पथसंचलन करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीआई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
स्वतःचे, आपल्या देशाचे आणि सामाजिक संरक्षण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20.03.1927 रोजी समता सैनिक दलाची स्थापणा केली . आईवडिलांनी आपल्या मुलांना,सैनिक निर्मिती साठी, सुसंस्कारीत करण्यासाठी सैनिक बनवा.फुले आंबेडकरी विचारांची बंदूक खांद्यावर घेतलेला हा सैनिक खोलवर रुजलेली विषमतावादाची ची मुळं समूळ उपडून काढेल., यात शंका नाही. असेही वक्त्यांनी बोलून दाखवलं.या शिबिराचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा, संविधान मैत्री संघ आणि समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचं प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्ष पौर्णिमा नागदेवे यांनी,संचालन डॉ. दिशा गेडाम यांनी केले.संविधान मैत्री संघांचे संयोजक अतुल सतदेवे आणि संच यांनी अथक परिश्रम केले.या कार्यक्रमात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.





