
आमगाव :-वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षेचा अर्थात NEET 2023 चा निकाल जाहीर होऊन काही तासही उलटले नाही.आमगाव तालुक्यातील नितीननगर येथील विद्यार्थिंनीं कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
नीट (NEET ) परीक्षेत आलेल्या अपयशाने खजून जावून एका 18 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. सलोनी रवी गौतम असे या मुलीचे नाव आहे. काही दिवसांपासून सलोनी ही राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (National Eligibility Cum Entrance Test) म्हणजेच नीट परीक्षेची (NEET Exam) तयारी करत होती. काही दिवसापासून ती तणावात असल्याची चर्चा आहे. नुकताच काल रात्रीला नीटचा निकाल जाहीर झाला. रात्रीला सर्व झोपी गेल्यानंतर आपल्या अभ्यास च्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे दरम्यान आई उठली असता ही बाब लक्षात आली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीन रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आले. या घटनेला घेऊन गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एमबीबीएस (MBBS) आणि तत्सम वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सलोनी ही एक कोचिंग कलासेस चालविणारे रविकुमार गौतम मुलगी होती व आमगाव पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम यांची पुतणी होती आणि तिने 2023 मध्ये इयत्ता 12 वी पूर्ण केली.तिला बारावीत तिला चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे नीट परीक्षेतही आपल्याला चांगले गुण मिळतील अशी तिची अपेक्षा होता. पण चांगले मार्क न मिळाल्याने या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं.





