36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ आ.रहांगडाले आदिवासी क्षेत्रात ९०.०० लक्ष रस्ते बांधकामाचे भूमिपूजन

आ.रहांगडाले आदिवासी क्षेत्रात ९०.०० लक्ष रस्ते बांधकामाचे भूमिपूजन

0
28

blank

तिरोडा:- मागील ऑगस्ट २०२२ च्या अतिवृष्टीमुळे आदिवासी बहूल गावातील दोन गावांना जोडणा-या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात मोठ्या प्रमाणात अडचण उद्भवत होती नागरिकांच्या समस्या दूर होण्याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित,वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री सुधीर मूनगट्टीवार यांच्याकडे रस्ते दुरुस्तीकरिता मागणी केली असता तातडीने आदिवासी क्षेत्रातील रस्त्याकरिता १०.०० कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला यामध्ये सोनेखारी-नवेझरी ३०.०० लक्ष, सोनेखारी कुलपा रस्ता २०.०० लक्ष, सोनेखारी खैरी रस्ता १०.०० लक्ष, नांदलपार लाढरी रस्ता २०.०० लक्ष अशा एकूण ९०.०० लक्ष मंजूर विकासकामांचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने प.स.सभापती कुंता पटले, प.स.सदस्य तेजराम चव्हाण, ज्योती टेंभेकर, सोनेखारी सरपंचा दिव्या पटले, नवेझरी सरपंच,महेंद्र भांडारकर, नांदलपार सरपंचा अरुणा परतेती, प्रमोद बांते, जितेंद्र टेंभेकर, दर्शन कूसराम, शिव शेंडे व संबधीत गावातील ग्रा.प.सदस्य व गावकरी उपस्थित होते.

blank