41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सचेत अनंतवार प्रथम विजेता तर  प्रत्युष नारनवरे द्वितीय विजेतेपदाचे...

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सचेत अनंतवार प्रथम विजेता तर  प्रत्युष नारनवरे द्वितीय विजेतेपदाचे  मानकरी

0
43

blank

गडचिरोली: जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, गडचिरोली व समस्त सक्षमीकरण बहुउद्देशिय विकास संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्रीएशन हाॅल, काॅम्पलेक्स, गडचिरोली येथे समता क्रीडा पर्व अंतर्गत 40 दिवसीय बॅडमिंटन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराची सांगता ही दि. 18 जून 2023 रोजी जिल्हास्तरीय बॅंडमिंटन स्पर्धा वयोगट 8 ते 11 वर्षे विद्यार्थ्यांकरिता आयोजित करून करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. भावना लाकडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेत एकुण 14 स्पर्धकांनी भाग घेवून उत्कृष्ट असे खेळातील आपले कौशल्य दाखविले. या स्पर्धेत  विद्यार्थ्यांच्या पालकांचाही चांगला प्रतिसाद होता, त्यांनी खेळाडूना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देवून खेळाडूंचे मनोबल वाढवीले. स्पर्धेत प्रथम विजेता सचेत अनंतवार तर द्वितीय विजेता प्रत्युष नारनवरे हे ठरले. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, स्मृर्तीचिन्ह व रोख बक्षिस स्वरूपात प्रदान करण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
बॅडमिंटन शिबीराचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करून खेळाची आवड निर्माण करणे व शिक्षणासोबतच खेळामध्येही उत्तम कामगिरी करण्याची संधी देवून जिल्हा, राज्य व देश पातळीवर प्रयत्न करण्याची वाट दाखविणे हाच एक उद्दात्त हेतू होय. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मजबुत बनवून सुदृढ आरोग्याचा लाभ शैक्षणिक जीवनात पण करून घेता यावा हेच उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून नकुल रणदीवे तसेच त्यांचे सहकारी अथर्व हलामी, शुभम् पुराम यांनी सहकार्य केले व संस्थेचे कार्यकर्ते श्रेयस सयाम, प्रविना लाडवे तसेच संस्थेचे सचिव किर्तीकुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष महेन्द्र वानखेडे व सदस्य प्रशांत लाकडे यांचे मोलाचे योगदान राहिले.

blank