37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ विदर्भात आज मान्सूनचे आगमन,गोंदिया जिल्ह्यातही पावसाची हजेरी

विदर्भात आज मान्सूनचे आगमन,गोंदिया जिल्ह्यातही पावसाची हजेरी

0
48

blank

गोंदिया : राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात गुरुवारपासूनच पावसाला सुरवात झाली.आज शुक्रवारला सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली.11 ते 1 या दोन तासाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली तर गोंदियाचा अंडरग्राऊड पुल अवघ्या एक दीड तासाच्या पावसानेच जलमय झाल्याचे दिसून आले.रेलटोली उड्डाणपुलाजवळील भागातील तुंबलेल्या नाल्यातील घाण या पावसामुळे रस्त्यावर आल्याने पालिकेच्या नालेस्वच्छता अभियानाचीही पोलखोल झाल्याचे दिसून आले. blank

रोहिणी नक्षत्रापाठोपाठ मृगही कोरडाच जात असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱी विवंचणेत सापडला असतानाच  २२ जूनला आर्द्रा नक्षत्रास सुरुवात होताच गुरुवारी सायंकाळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात दमदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, उन्हाची दाहकता कमी झाल्यामुळे नागरिक सुखावला आहे.

blank