33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता नागपूरच्या अट्टल चोरट्यास गोंदिया पोलिसांनी केली अटक

नागपूरच्या अट्टल चोरट्यास गोंदिया पोलिसांनी केली अटक

0
37

blank

गोंदिया : नागपूर शहरातील सराईत गुन्हेगार व गोंदिया जिल्ह्यातील तिन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मरारटोली,बसंतनगर परिसरातून अटक करण्यात आली.ही कारवाई २६ जून रोजी पहाटे ४ वाजता करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपीत नरेश अंकालू महीलांगे
(२६) रा.दीप्ती सिग्नल पुजाराम वाडी,कळमना नागपूर व दीपक चंदू बघेले (२२) रा.पिपरीया ता.खैरागड जि.राजनांदगाव (छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी नरेंद्रकुमार जैन यांच्या देवरी आमगाव रोड महावीर राइस मिल मधील ४ लाख ३८ हजार रूपये,नवाटोला येथील यादोराव नरसय्या पंचमवार यांच्या राहते घरून सोन्याचे दागिणे व रोख ६२ हजार रूपये,एकाच रात्र दरम्यान दोन घरफोड्या घडल्या होत्या.डुग्गीपार पोलिस सडक-अर्जुनी येथील २५ मार्च २०२३ चे ११ ते ६:३० वाजता दरम्यान जिल्हा को ऑपरेटीव्ह बँकेचे चॅनल गेटचा कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता.ह्या तिन्ही चोरी या आरोपींनी केल्या होत्या.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी तिन्ही दाखल गुन्ह्यातील आरोपितांचा शोध तत्काळ घेण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिसांना दिले होते.स्थानिक गुन्हे शाखा, देवरी पोलीसठाणे, डुग्गीपार पोलीस पथक यांनी फरार झालेल्या अज्ञात आरोपीचा कसोसिने शोध घेत होते. २८ मार्च रोजी आरोपी प्रदीप उर्फ दादू देवधर ठाकूर (३०) रा.देवधर महतो, वारभाट (छत्ती सगङ) याला अटक करण्यात आली होती.
त्याच्या जवळून ३ लाख ४७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता.अटक असलेल्या आरोपीने नरेश महिलांगे याच्या
सोबत मिळून तिन्ही गुन्हे केल्याचे सांगितले.ही कारवाई पोलीस निरीक्षक दि नेश लबडे, रामनगरचे संदेश केंजले,
सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर,विजय शिंदे,पोलीस उपनिरीक्षक विघ्नें,पाटील,सहाय्यक फौजदार कावळे, पोलीस हवालदार मिश्रा,मेहर, देशमुख,कोडापे,हलमारे,लुटे,भेलावे,बिसेन,शेख,तुरकर,ठाकरे,पटले,पोलीस शिपाई केदार, रहांगडाले,भांडारकर,चालक पोलीस शिपाई गौतम,पांडे तसेच पोलीस ठाणे रामनगर,रावणवाडी,गंगाझरी पोलीस पथकाने केली आहे.तीन महिन्या पासून आरोपी नरेश महीलांगे याच्या मागावर गोंदिया पोलिस होती.नागपूर,रायपूर,राजनांदगाव, येथे शोध घेण्यात येत होता.सदर आरोपीने पाचपावली पोलीस ठाणे अंतर्गत २५ जून रोजी क्रेटा गाडी आणि रोख रक्कम चोरी केली होती.नागपुरातून चोरलेली क्रेटा गोंदियाच्या कुडवा येथे असल्याचे गंगाझरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट
टिळेकर यांना दिसली.गोंदिया पोलीस त्या गाडी आणि आरोपीचा शोध घेत असताना क्रेटा गाडीतील आरोपीला पोलीस आपल्या मागे लागल्याची चाहूल लागताच क्रेटा गाडी सोडून पळून गेला.पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून मरारटोली ,बसंतनगर परिसरातून अटक केली .

blank