मुंबई-महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप होत आहे. अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार आज शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर 9 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
थोड्याच वेळात शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस शपथविधी सोहळ्याच्या सभागृहात दाखल झाले आहेत.

#LIVE | #राजभवन | शपथविधी सोहळाhttps://t.co/rPI5b2kEaO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2023

राजभवनात राष्ट्रवादी व भाजपचे नेते एकत्र दिसत आहे.
शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळही अजित पवारांसोबत राजभवनात दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रफुल्ल पटेल केंद्रात?
सुत्रांची माहिती आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना समजवायचा प्रयत्न केला. पण अजित पवार ऐकायला तयार नव्हते. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळही शिंदे गट-भाजपसोबत सरकारमध्ये सामील होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.