
गडचिरोली,दि.02-सध्या चालु असलेल्या “वनरक्षक भरती“ व “तलाठी भरती” या करीता स्थानिक आदिवासी उमेदवारांना चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली व भामरागड यांचेकडून पेसा प्रमाणपत्र देण्याचे शासनाने ठरविले आहे.परंतु “पेसा प्रमाणपत्र” सदर कार्यालयाकडून उमेदवारांना प्राप्त होण्यास खूपच दिरंगाई होत असल्याने नागपूर विभागाचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांना अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्यावतीने निवेदन सादर करुन सदर समस्येचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात उमेदवार जिल्हा मुख्यालयापासून १००-१२५कि.मी. प्रवास करून सदरचा प्रमाणपत्र घेण्यास येतात. परंतु त्यांना प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही.या मध्ये त्यांचा किमती वेळ वाया जात आहे व त्याचा परिणाम अभ्यासावर देखील होत आहे. आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १७/०७/२०२३ आहे.असेच मंदगतीने कार्य चालु राहिल्यास उमेदवार फॉर्म वेळेवर भरू शकणार नाही परिणामी बेरोजगार फॉर्म भरण्यापासून वंचित राहील.या संदर्भीय विषयावर अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने उपस्थित आकाश मडावी महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष,संतोष आत्राम विदर्भ युवा अध्यक्ष शुभम आत्राम विदर्भ कार्याध्यक्ष, अमन बोरे माजी विदर्भ सहसचिव, साहिल मडावी माजी जिल्हाध्यक्ष गोंदिया, गणेश बालवंशी माजी जिल्हा युवा कार्याध्यक्ष नागपूर ,अक्षय मसराम,मयूर कोवे,सागर इवनातें, आदी युवा पदाधिकारी उपस्थित होते..




