
गोंदियाच्या मुन्नालाल यादव यांनी वयाच्या ८१ वव्या वर्षी ३ सुवर्णपदक पटकावली आहेत. तसेच दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी त्यांची निवड देखील झाली आहे. मुन्नालाल यादव यांचा गाईच्या दुधाचा व्यावसाय असून त्याच्यावरच ते आपला उदरनिर्वाह करतात. सुवर्णपदक मिळाले म्हणून पोट भरत नाही. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी, असे मुन्नालाल यादव यांनी म्हटले आहे.




