
गोंदिया,दि.18– गोंदिया-आमगाव राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागून वाहणार्या पांगोली नदीवरील पूलाचे बांधकाम अर्धवट असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे.हलक्या स्वरुपाचेही पाऊस आले तर नदीवर तयार करण्यात आलेला कच्चा पूल पाण्याखाली जाऊन गोंदिया-आमगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत असल्याने या अर्धवट पूलाचे बांधकाम त्वरीत पूर्ण करण्यात यावे,अन्यथा चक्काजाम आंदोलन करावा लागेल असा इशारा गोंदिया तालुका महिला काँग्रेसच्यावतीने निवेदनातून देण्यात आलेला आहे.कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता बांधकाम अर्धवट करण्यात आले तर पावसाळ्यापुर्वी या मुख्य मार्गावरील पूलाचे बांधकाम पुर्ण करणे आवश्यक असताना टाळाटाळ केल्याने आज प्रवाशासंह सामान्य नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ आल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तालुका महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अनिताताई रमेश मुनेश्वर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी प्रदेश सचिव अमर वराडे,तालुका अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत,शहराध्यक्ष जहिर अहीर अहमद, पूर्व प्रदेश सचिव विनोद जैन, सेवादल जिल्हाध्यक्ष राजीव ठकरेले, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष जितेश राणे, एनएसयूआई जिलाअध्यक्ष हरिश तुळसकर, पूर्व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, तालुका महासचिव रंजीत गणवीर, ओबीसी जिला महासचिव जीवन शरणागत,महिला जिल्हा संघटिका रूपाली ऊके, चित्रा लोखंडे, निलिमा नागदवने, नामदेव वैद्य, ग्रामपंचायत सदस्य खमारी अश्विनीताई गायधने, वरिष्ठ काँग्रेसी सुरेश चौरागडे, पूर्व पंचायत समिती सदस्य प्रकाश डहाट, ग्रामपंचायत फुलचूर सदस्य सुमित शेंडे, सेवादल ग्राम प्रमुख खमारी राजेंद्र चिंधालोंरे, प्रदेश सचिव अमन तिघाला, कृष्णा बीभर, लोकनायक राहांगडाले, प्रकाश ब्राह्मणकर, जायद सोलंकी, सोमेश्वर ठकरेले, मंथन नंदेश्वर इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




