37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ वृक्षारोपण करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

वृक्षारोपण करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

0
58

blank

गोंदिया- अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्था (NGO) एकोडीच्या वतीने मोक्षधाम येथे माजी उपसरपंच व पत्रकार किरणकुमार मेश्राम यांच्या अध्यक्षतेत वृक्षारोपण करण्यात आले.प्रमुख अतिथि म्हणून ग्राम पंचायत सदस्य नामदेव बिसेन, निरज रिणायत, बंटी रिणायत व आसु पठाण हे होते. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात आजही मानाचे स्थानअसल्याचे विचार किरणकुमार मेश्राम यांनी व्यक्त केले. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. यासोबतच त्यांच्या अनेक कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी; लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. त्यांचे अण्णाभाऊ साठेंचे क्रांतिकारक विचार अण्णाभाऊ साठे कविता आणि अण्णाभाऊ साठे शायरी, पोवाडे आजही अभिमानाने गायले जातात. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहेत असे उपस्थितांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्था (NGO) एकोडी चे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे (पत्रकार) , उपाध्यक्ष आरिफ़ पठाण, सचिव टेकसिंह पुसाम, सदस्य दिलिप देशमुख, पौर्णिमा तायवाडे, फुलवंता ठाकरे आदिनी परीश्रम घेतले.

blank