विषय शिक्षकांची रिक्त पदे प्राथ.शिक्षकांमधून भरा: कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी

0
18

गोंदिया -शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी   कास्ट्राईब शिक्षक संघटना म. रा. शाखा जिल्हा गोंदिया जिल्हाध्यक्ष संजय उके  यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद गोंदिया अधिनस्त इयत्ता सहावी ते आठवी साठी रिक्त असलेल्या विज्ञान/गणित,भाषा व सामाजिक शास्त्र विषय शिक्षकांची पदे प्राथमिक शिक्षकांमधून तातडीने भरण्यात यावे, विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लावण्यात यावी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी पदोन्नती प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावे, प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी सर्व शिक्षकांना अविलंब देण्यात यावा, यांसह विविध मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, सिध्दार्थ भोतमांगे, उत्क्रांत उके, दिलीप रामटेके, संजय भावे, अमित गडपायले, अजय शहारे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.