
आरोपी ताब्यात, शांतता समिती.बैठकीत शांततेचे आवाहन
पुसद,ता.4 सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो टाकून त्यावर बौद्ध समाजाच्या भावना दुखावतील अशी आक्षेपार्ह पोस्ट ता.4 रोजी सकाळी आठ वाजता टाकल्याने खंडाळा पोलिसांनी गुन्हे दाखल करून एका युवकास ताब्यात घेतले.
मोबाईल वरील इन्स्टाग्रामवर अजय संगोबा गादेकर ( वय 22 , पांढुर्णा केदारलिंग) याने वादग्रस्त पोस्ट तयार केली. बौध्द समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य करून समाजात तेढ निर्माण केली.या प्रकारची जबानी तक्रार बाबुराव शिवराम वाढवे ( रा. पांढुर्णा केदारलिंग) यांनी दिल्यावरून आरोपी विरुद्ध खंडाळा पोलिसांनी गुन्हे दाखल केला. ठाणेदार निलेश गोपालचावडीकर यांनी आरोपीस ताब्यात घेऊन तपास सुरू केला .
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ठाणेदर गोपाल चावडीकर यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.




