
गोंदिया– केंद्र सरकारणे पी. एफ. आर. डी. ए. कायदा रद्द करावा, राज्य शासनाने जुनी पेंन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागु करावी यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगष्ट 2023 रोजी शासकिय, निम- शासकिय, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी गोंदिया शहारात मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे यांचे नेतृत्वात भव्य मोटारसायकल रॅली काढली
जुनी पेन्शन लागु होण्याचे संदर्भात 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत राज्यात कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले होते त्यावेळी शासनाकडून ठोस आस्वासन मिळाल्यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले होते त्यानुसार राज्य शासनानी फॅमिली पेंन्शन व ग्रज्युईटी चे शासन निर्णय काढले परंन्तु जुनी पेंन्शन लागु करण्यासाठी त्रिसदशीय समिती नेमुन तीन महिण्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते ती मुदत 14 जुन 2023 लाच संपली असून मा. सचिव यांनी 31 जुलै 2023 पर्यन्त अहवाल प्राप्त होईल असे सांगितले होते परंतु शासनाने पुन्हा समितीला 2 महिण्याची मदतवाढ दिली त्यामुळे पुन्हा शासनाची चालढकल करण्याची मंशा दिसत आहे.
शासनाच्या या धोरणामुळे शासकिय कर्मचाऱ्यांत असंतोषाची भावणा निर्माण झाली. जुन्या पेंन्शन संदर्भात ठोस कार्यवाही झाली नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरीता 9 ऑगष्ट 2023 रोजी दुपारी 1.30 ते 3 या वेळेत गोंदिया शहरातील प्रशासकिय ईमारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रॅलीला सुरवात झाली जयस्तंभ चौक, मिर्मल टॉकीज, फुलचूर नाका ते जिल्हाधिकारी कार्यालया समोर या रॅलीचा समारोप झाला मा. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले
मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे यांचे समवेत कमलेश बिसेन, संतोष तोमर, भगीरथ नेवारे, राकेश डोंगरे, चंद्रशेखर वेद्य, रमेश नागपल्लीवार, नंदलाल कावळे, राजेश कुंभलवार, तु.बा.झंजाड, विस्वनाथ कापगते यासह या रॅलीत माठया संख्येने जिल्हयातील शासकिय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी झाले होते.





