34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जन्म व मृत्यू नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर करुन दाखले सुलभ मिळ्ण्याची कार्यप्रणाली विकसित...

जन्म व मृत्यू नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर करुन दाखले सुलभ मिळ्ण्याची कार्यप्रणाली विकसित होणार

0
36

blank

  • श्रीमती भारती ठाकरे, सहसंचालक, जनगणना कार्यालय,

गोंदिया-जनगणना कार्यालय मुंबई सहसंचालक भारती ठाकरे यांनी दिनांक 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील आरोग्य संस्था, ग्रामपंचायती, नगरपरिषद ,नगरपंचायती यांना भेटी देवुन नागरी नोंदणी पद्धती, जन्म व मृत्यू नोंदणी बाबत होत असलेल्या कामकाजाची पाहणी केली. तत्पुर्वी सहसंचालक यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांची भेट घेऊन जिल्ह्यात नागरी नोंदणी पद्धती व कार्यप्रणाली बाबत चर्चा केली.
जन्म व मृत्यु सारख्या महत्वाच्या घटनाच्या नोंदणी ऑनलाईन crsorgi.gov.in या पोर्टल वर करण्याच्या सुचना दिल्या. भविष्यात ज्या आरोग्य संस्था जसे जिल्हा रुग्णालये, ग्रामीण  रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बालकांचा जन्म होतो त्याच ठिकाणी तेथील वैद्यकिय अधिकारी यांना स्वतंत्र लॉगिन प्रणाली देण्यात येवुन लोकांना जन्म व मृत्यु घटना झालेल्या ठिकाणी जन्म/मृत्युचे दाखले देण्याबाबत कार्यप्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यात झालेल्या घटने दरम्यान कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती,  नगरपरिषद, नगरपंचायती यांनी घटनेची ऑनलाईन नोंदणी करुन त्या घटनेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सहसंचालक यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गोरेगाव,  पंचायत समिती गोरेगाव,  ग्रामपंचायत भडंगा,  ग्रामपंचायत कमरगाव, तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील  ग्रामपंचायत ड्व्वा , प्राथमिक आरोग्य केंद्र ड्व्वा व गोंदिया तालुक्यातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, केटीएस सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा येथे भेट देऊन पोर्टलवर जन्म/ मृत्यू नोंदणी करण्यात येते किंवा नाही याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.भेटीदरम्यान संबधीत प्रमुखांना नागरी नोंदणी पद्धती बाबत मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लोकांना दाखले सुलभतेने देण्याबाबत कार्यप्रणाली विकसित करण्याच्या सुचना दिल्या .
भेटी दरम्यान त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, के.टि.एस. सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.बि.डी. जैस्वाल ,आरोग्य पर्यवेक्षक विजय शेंडे, आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद नंदागवळी व सांख्यिकी सहाय्यक मनोजकुमार चव्हाण उपस्थित होते.

blank