
जिल्ह्यातील एकल महिला व अनाथ मुलांना धान्य, जीवनोपयोगी सामान व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
गोंदिया, (दि. 1Y): गोंदिया जिल्ह्यात अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या समाजसेविका प्रा. डॉ. सविता बेदरकर यांनी आपले संपूर्ण जीवन या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अनाथ मुलांसाठी वाहून दिले आहे. अनाथांची सेवा हेच परमोधर्म मानून समाजसेवा करणाऱ्या सविता बेदरकर यांचे कार्य खूप मोलाचे आहे असे प्रतिपादन आज
निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले आहे. त्या आज सविता बेदरकर यांचे निवासस्थानी जिल्ह्यातील एकल महिला व अनाथ मुलांना धान्य, जीवनोपयोगी सामान व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या सुविद्य पत्नी सविता अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ता भरत क्षत्रिय, LIC चे विकास अधिकारी अविनाश ठाकूर, सेवानिवृत्त शिक्षक प्रा. अनिल मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार अमरचंद ठवरे उपस्थित होते.

दरवर्षी डॉ. सविता बेदरकर या अनाथ मुलांसाठी व कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी धान्य, तेल व इतर जीवनोपयोगी साहित्य व शैक्षणिक लेखन साहित्य वाटपाचे कार्यक्रम वर्षातून दोनदा आपल्या पहादी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करतात. त्या समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियाच्या माध्यमातून धान्य व इतर वस्तू देण्याबाबत आवाहन करतात व त्यांच्या आवाहनाला समाजातील लोकं या चिमण्या पाखरांना बळ देणेसाठी भरभरून सविता बेदरकर यांच्या संस्थेला दान देतात. ‘इस हात से ले और इस हात से दे’ या म्हणीप्रमाणे सविता बेदरकर यांच्याद्वारे या अनाथ मुलांना वर्षभर पुरेल इतके धान्य व जीवनोपयोगी साहित्य व मुलांना शैक्षणिक लेखन साहित्याचे वाटप वर्षातून दोनदा (एक सत्र सुरू होतांनी व दिवाळीत नवीन कपडे, नास्ता, धान्य) केले जाते. म्हणजेच समाजाकडून घेऊन समाजालाच अर्पण केले जाते. त्यामुळेच त्यांना अनाथांची माय म्हणून संबोधले जाते. या कार्यात त्यांना अनेक सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांचा देखील सहकार्य मिळतो. ‘समाज देनेके लिये बैठा है, सिर्फ मांगनेवाले हात और नियत साफ होना चाहीये’ याप्रमाणेच ही अनाथांची माय या गोंदिया परिसरात कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
सविता बेदरकर यांना मदत करणाऱ्या दानदात्यांमध्ये आमदार विनोद अग्रवाल, सीए.धिरज अग्रवाल, सहयोग क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी चे जयेश रामादे, कालू भालोटिया, साई इंटरप्राईजेस चे लारोकर,
भरत क्षत्रिय, वैशाली कोहपरे, नानन बीसेन, इंजिनिअर सुनील तोरणे, यशोदा सोनवणे, भरत फेंडर, रत्नेश डहाट, प्रवीण बुराण, राकेश टेंंभरे, बालू भोयर, विजय पाऊलझगडे, जयश्री गावंडे , प्रवीण बोरकर, वंदना लांजेवार, अथर्व बहुउद्देशीय संस्था, धनपाल कावळे, भुपेंद्र बोरकर, प्रा. नीता खांडेकर, गणेश मुनिश्वर,सीमा डोये, अॅड.प्रमोद फुंडे, डॉ.छाय लंजे, LIC विकास अधिकारी अविनाश ठाकूर, मंदा गायधने व इतर सर्व दानदाते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कवयित्री सरिता सरोज ( कु. कल्याणी डहारे) यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार अमरचंद ठवरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनीता भेलावे, प्रिया हरडे(सोनेवाने),कैलाश भेलावे, प्रीती जेवठे, मंजू शिवंनकर, प्राची गुडधे, सरिता गजभिये, वशिष्ठ खोब्रागडे, विश्वजीत बागडे, धनेंद्र भुरले,प्रमोद गुढधे व इतर सहकारी यांनी परिश्रम घेतले.





