37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ तिरखेडी येथे आता होणार ओबीसींची जातनिहाय जनगणना 

तिरखेडी येथे आता होणार ओबीसींची जातनिहाय जनगणना 

0
33

blank

गोंदिया- राज्यातच नव्हे तर देशात गेल्या काही वर्षापासून सातत्याने ओबीसी समाजातील जातींची जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे.मात्र केंद्रसरकारने जनगणना करण्यास नकार दिल्यानंतर आत्ता गावखेड्यातील ग्रामपंचायतीनीच आपल्या स्तरावर ओबीसींची जनगणना करण्याचा ठराव पारित करुन जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.गोंंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातंर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत तिरखेडी येथील 22 आँगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत सरपंच प्रिया मनोज शरणागत यांचे अध्यक्षतेख़ाली ग्रामपंचायत स्तरावर”ओबीसी जातनिहाय जनगणना” करण्याचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 1931 च्या नंतर आजपर्यंत ओबीसी ची जातनिहाय जनगणना झाली नाही. याकडे सर्व सरकारे दुर्लक्ष करतात.केन्द्रच्या गृहखातेद्वारे ही जनगणना केली जाते.राज्यसरकारनेही जनगणनेचा ठराव विधानंमंडळात पारीत केला,मात्र राज्यसरकारनेही याकडे लक्ष दिले नाही.ओबीसींची जनगणना करण्यास कुणीच तयार होत नसल्याने थेट ग्रामपंचायत स्तरावर ही जनगणना करण्यासाठी सदर ठराव ग्रामसभेत ठेवून सर्वसमतीने पारित करण्यात आल्याची माहिती सरपंच प्रिया मनोज शरणागत यांनी  दिली.
जिल्ह्यातील सरपंच संघटनेने सुध्दा सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाना आँगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामसभेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव घेऊन तो पारीत करुन राज्य व केंद्रसरकारकडे पाठविण्याची कारवाई करावी अशी भूमिका घेतली आहे.

blank