डोंगरगाव/खजरी‌ येथे एक कोटी पंचवीस लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
15

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/खजरी‌ येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नातुन मंजूर एक कोटी पंचवीस लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यात जलजीवन जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना,२५/१४ अंतर्गत रस्ता बांधकाम, म.गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत रस्ता बांधकाम व घनकचरा व्यवस्थापन अश्या विविध विकास कामांचा समावेश आहे.या दरम्यान माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना म्हणाले कि, आपण जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून त्यांच्या समस्येला प्राधान्य देऊन निराकरण करीत असतो व हेच आमचे राजकीय व सामाजिक जीवनाचे ध्येय राहिले आहे. मी कधीही जनतेच्या सेवेसाठी व समस्या सोडवण्यासाठी निधीची कमतरता होऊ देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, जिल्हा परिषद सदस्य भुमेश्र्वर पटले, पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते, प. स.सदस्य चेतनजी वळगाये,शिशिर येळे तालुका महामंत्री,पौर्णिमाताई गणवीर सरपंच डोंगरगाव/खजरी,महेश गहाने सरपंच खजरी, देवराम डोये,ज्ञानेश्वर खोटेले उपसरपंच डोंगरगाव,तुकाराम राणे ग्रा.प. सदस्य,टीकाराम शिवणकर,विनोद हुकरे, प्रभाताई रामटेके ग्रा.प. सदस्या, उषाताई डोये, अर्चनाताई ब्राह्मणकर, वनिताताई खोटेले, ताराबाई कठाने, रंजुताई चाचेरे,.रवींद्र बोरकर, .पुंडलिकजी लांजेवार,अक्षदेव गणवीर,मोहन खोटेले,जगनजी मानकर,वासुदेव मानकर, श्री.महादेवजी शेंडे, श्री.धनलालजी डोये,यशवंतजी कठाने, विष्णूजी राणे, विनायकजी लांजेवार, खेमराज डोंगरवार,दिनेश कोरे व परिसरातील गणमान्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.