राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

0
21

गोंदिया, दि.2 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांचे विद्यमाने राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे (14 व 17 वर्षाआतील मुले/मुली) आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल येथे 1 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशन यांचे तांत्रिक सहकार्याने करण्यात आले आहे.

        या स्पर्धेत राज्यातील 8 विभागातील 426 मुले व मुली खेळाडू संघव्यवस्थापक सहभागी होणार आहेत. खेळाडुंची नोंदणी 1 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येत असून 2 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुली खेळाडुंची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुलातील वसतिगृहामध्ये तर मुले खेळाडुंची निवास व्यवस्था नगर पालिकाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आली आहे.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत गठीत करण्यात आलेल्या 3 सदस्यीय तांत्रिक समिती मार्फत सदर स्पर्धेमधून निवड झालेले 14 वर्षाआतील खेळाडु भारतीय शालेय खेल महासंघामार्फत छत्तीसगड जगदलपुर येथे तसेच 17 वर्षाआतील खेळाडु महाराष्ट्र लातुर येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

       सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत 2 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे होणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.