ॲक्युट पब्लिक शाळेत साजरा करण्यात आला ” राष्ट्रीय संविधान दिवस “

0
31

गोंदिया,दि.२६-येथील ॲक्युट पब्लिक शाळेत “राष्ट्रीय संविधान दिवस” अतिशय हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे जनक “डॉ बाबासाहेब आंबेडकर” यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्ज्वलित करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, गीत आणि संविधान सादर वाचन केले.
संविधानाचे दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी “संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे” सचिव संजयकुमार भास्कर उपस्थित होते. प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची जाण ठेवावी असे बहुमोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले व सर्वांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला संस्थेच्या सह सचिव श्रीमती शुभा शाहारे, मुख्याध्यापिका श्रीमती उज्जवला, मुख्याध्यापक श्री कापगाते,एकता तसेच शळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम शांततेने पार पडला. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” च्या गीताने करण्यात आली.