जिल्हा युवा महोत्सवाचे थाटात उदघाटन;पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार

0
19
????????????????????????????????????
  • स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
  • विविध विभागाचे स्टॉल

वाशिम, दि. 30  पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,  वाशिम यांच्या संयुक्त वतीने आज 29 नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे उदघाटन वाटाणे लॉन येथे थाटात करण्यात आले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी फित कापुन या महोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, आमखेडा येथील कृषी महाविद्यालयाचे संचालक राजू घुगे व तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध विभागाने तसेच उद्योजकांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल निलेश सोमाणी, शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अजित भुरे व महेंद्र ठाकरे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा व उद्योजिका विमल राजगुरु यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हयातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविला. सोलो (नृत्य)  प्रथम गौरी बगाडे, व्दितीय अस्मिता भगत, तृतीय तृप्ती चक्रनाराण, समुहनृत्य प्रथम राजस्थान महाविद्यालय, वाशिम, व्दितीय केकतउमरा येथील राजा प्रसेनजीत संस्था, तृतीय मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, वाशिम, गीत गायन (सोलो) प्रथम प्रणव खडसे, व्दितीय महेश राठोड, एकांकिका प्रथम प्रदिप पट्टेबहादूर, वकृत्व स्पर्धेत प्रथम वैभव इंगळे, व्दितीय राधिका दंडे, तृतीय ऋतुजा योगोवाड, समुहलोक गीतमध्ये प्रथम प्रियदर्शनी महाविद्यालय, असेगांव पेन, व्दितीय कृषी महाविद्यालय, आमखेडा, कथालेखन प्रथम प्रिया रोकडे, व्दितीय ऋतुजा योगोवाड, तृतीय गौरव चोपडे, पोस्टर स्पर्धेत प्रथम आकांक्षा पानझाडे, व्दितीय दिपाली बारई, तृतीय उत्सवी सावजी, रांगोळी स्पर्धा प्रथम आकांक्षा पानझाडे, व्दितीय सलोनी राठोड, तृतीय वर्षा जाधव, पाककला स्पर्धेत प्रथम वृक्षा तोडासे, व्दितीय राधिका दंडे आणि तृतीय उत्कर्षा घुगे आणि फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम प्रज्वल जिजोते, व्दितीय शंतनु खराडे आणि तृतीय पवन लेमडे यांनी पारितोषीके पटकाविली. यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात कृषी विभाग (आत्मा), कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा, तृप्ती पापड उद्योग, श्री गुरु माऊली खादी ग्रामोद्योग, श्री विठ्ठल कृपा मसाला प्रॉडक्ट, मध संचालनालय, जिजाऊ मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीज, वाशिम, जिल्हा कौशल्य विकास विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, एन.के. फ्रुटस अँड प्रॉडक्ट, वन विभाग, वाशिम, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग विकास मंडळ, मिटकॉन व तालुका कृषी अधिकारी, मानोरा आदींचे स्टॉल लावण्यात आले होते.

महोत्सवात आयोजित विविध स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा. गजानन वाघ, प्रा. डॉ. शैलेष सोनोने, प्रा. डॉ. दिपक दामोधर, प्रा. डॉ. अनिल सोनुने, निलेश सोमाणी, सुनिता अवचार, संदिप पट्टेबहादूर, विनोद पट्टेबहादूर यांनी काम पाहिले. युवा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभागाचे क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे, संतोष फुफाटे क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, विजय बोदडे, भारत वैद्य, विकास तिडके, प्रकाश मोरे, कृषी विभागाचे कृषी अधिकारी दिलीप कंकाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, कृषी सहायक एम.डी. सोळंके, कृषी पर्यवेक्षिका कृतिका नागमोथे, कृषी पर्यवेक्षक भारत नागरगोजे, राजेश राठोड, कृषी सहायक सुनिता वानखेडे, कालिंदा मुंढे, रेणुका इडोळे यांच्यासह क्रीडा व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. शशिकांत पवार यांनी केले. उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांनी मानले.