वाशिम, दि.01 : विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय 30 नोव्हेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे, उपविभागीय अधिकारी (वाशिम) वैशाली देवकर, श्री. ललीत वऱ्हाडे (कारंजा), श्री. सखाराम मुळे (मंगरुळपीर), कृषि विभागाचे उपसंचालक शांतीराम धनुडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, तहसिलदार सर्वश्री निलेश पळसकर (वाशिम), दीपक पुंडे (मालेगांव), प्रतिक्षा तेजनकर (रिसोड), शीतल बंडकर (मंगरुळपीर), कुणाल झाल्टे (कारंजा) व रवी राठोड (मानोरा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या, जिल्हयात 26 ते 29 नोव्हेंबर 2023 दरम्यान आलेल्या अवेळी पावसाने ज्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे तातडीने पुर्ण करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावे. असे त्या यावेळी म्हणाल्या.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान जिल्हयात आलेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम तालुक्यात 462 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 27 नोव्हेंबर रोजी रिसोड, भरजहाँगीर, वाकद, शिरपूर, अनसिंग व पार्डी आसरा या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनामे सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच मार्च, एप्रिल व मे 2023 या महिन्यात बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन अनुदान वाटप करण्यात आल्याची तसेच सतत पावसामुळे शेतपिकाचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याने जून, जुलै व ऑक्टोबर 2022 या महिन्यात अनुदान वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.