39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ आमदार चंद्रिकापूरे यांचे हस्ते विविध विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण

आमदार चंद्रिकापूरे यांचे हस्ते विविध विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण

0
49

blank

सडक अर्जुनी:तालुक्यातील पांढरी जि.प.क्षेत्र अंतर्गत कोसमतोंडी पं.स. क्षेत्रातील कोसमतोंडी,थाडेझरी,मुरपार,चिचटोला, घटेगाव,हेटी या गावामध्ये ५ डिसेंबर रोजी आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे स्थानिक विकास निधीतून मंजूर असलेल्या विविध कामाचे भूमिपूजन व काही ठिकाणी लोकार्पण करण्यात आले.कोसमतोंडी येथील नरहरी सोनार सभामंडप बांधकाम, राजाराम बन्सोड यांचे घरापासून नहरापर्यंत सिमेंट रस्ता,थाडेझरी येथे फुलीचंद वाळवे ते विलास मरस्कोल्हे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम,आओमप्रकाश परतेकी ते जितेंद्र मळकाम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम या कामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्या सुधाताई राहांगडाले,पं.स.सदस्या निशा काशिवार, कृउबा समिती सभापती डाॅ.अविनाश काशिवार,सरपंच महेंद्र पशिने,राकापा महिला अध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य रजनीताई गि-हेपुंजे, डी.यू.राहांगडाले कृउबा संचालक, डाॅ.के.जी.बोधनकर,यशवंत धुर्वे,सुधाकर पंधरे,भैय्यालाल पुस्तोडे,अश्विनी काशिवार पुजा वाघाडे,भोला कापगते व संपूर्ण गावचे सरपंच ,उपसरपंच ,ग्रा.प.सदस्य प्रतिष्ठीत नागरीक व जनता उपस्थित होते.

.

blank