देवरी,दि.०८- जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत देवरी तालुक्यातील आलेवाडा बीटात मोडणाऱ्या शाळांची शालेय क्रीडा स्पर्धा येत्या सोमवार (दि.११) पासून जिल्हा परिषद शाळा सिंदीबिर्रीच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.
या चार दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार तर ध्वजारोहक म्हणून देवरीचे माजी नगरसेवक यादोराव पंचमवार हे उपस्थिक राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती सविता पुराम, जि.प. सदस्य संदीप भाटीया, राधिका धरमगुळे, उषा शहारे, कल्पना वालोदे, पं.स. उपसभापती अनिल बिसेन, पं.स. सदस्य शालिकराम गुरनुले, वैशाली पंधरे, ममता अंबादे, शामकला गावळ, प्रल्हाद सलामे, भारती सलामे, रंजीत कासम, गटविकास अधिकारी कुवरलाल रहांगडाले, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, विस्तार अधिकारी एस जी वाघमारे हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सिंदीबिर्रीचे सरपंच कैलाश साखरे,पलानगावचे सरपंच मुक्ता शिवणकर,फुटाणाचे सरपंच कमलेश नंदेश्वर, बोरगावचे सरपंच कल्पना देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या चार दिवसीय क्रीडा स्पर्धेत आलेवाडा बीटातील आलेवाडा केंद्र,फुटाणा केंद्र आणि पालांदूर जमी. केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांतील वर्ग १ ते ८ चे स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती सिंदीबिर्री शाळेचे मुख्याध्यापक गजानन पाटणकर यांनी दिली. या स्पर्धेची सांगता १४ डिसेबरला बक्षीस वितरण सोहळ्याने होईल.