शेतकऱ्यांची पीक नोंदणी ऑफ लाईन पद्धतीने सुरू करा : आमदार विनोद अग्रवाल

0
22
गोंदिया : गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे यांची भेट घेऊन ऑफ लाईन पद्धतीने पिक नोंदणी सुरू करणे बाबत विनंती केली. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिक नोंदणी अद्याप बाकी असून पिकाची नोंदणी न झाल्यास शेतकरी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आपले धान विकू शकणार नाही यामुळे शेतकऱ्याला आपले धान कमी भावात खासगी व्यापाऱ्याला विकावे लागेल. सोबतच धानाचे नुकसान झाल्यास भरपाई पासून देखील शेतकरी वंचित राहील आणि बोनस साठी सुद्धा अपात्र होईल अशी चिंता आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. आमदार विनोद अग्रवाल यांनी ऑफलाईन पद्धतीने पिक नोंदणी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी केली असता जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ प्रकरण गंभीरतेने घेऊन जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन तसेच लेखी आदेश पत्राद्वारे निर्गमित केले आहेत.