आरोग्य उपसंचालक यांची प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनीला भेट

0
16

गोंदिया( दि.22 डिसेबंर)- आरोग्य सेवा (प्रा.आ.के) मुंबई कार्यालय  उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी दि.21 डिसेंबर रोजी  खोडशिवानी प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेव्दारे देण्यात येणार्या आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यात त्यांनी औषधी भांडार, लसीकरण कक्ष, शितसाखळी गृह व त्यातील उपकरण, प्रसुती गृह , शल्यचिकीत्सा गृह , वॉर्ड चे निरीक्षण केले. त्या शिवाय त्यांनी आरोग्य कर्मचारी यांची ऑनलाईन हजेरी बाबत बायोमेट्रीक यंत्र सुरु असल्याची सुद्धा खात्री केली.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राने जोपासलेली हर्बल आयुर्वेदीक बगीचाची पाहणी केली.तसेच नियमित लसिकरणासाठी वापर होत असलेले ईविन अ‍ॅप ची माहीती घेतली.डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी आपल्या भेटी मध्ये चांगल्या राखराखाव करीता वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा चमू वर दिली जात असलेल्या आरोग्य सेवेवर आंनद व्यक्त केला.
भेटी दरम्यान त्यांचे सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते.सदर भेट मा. डॉ नितीन वानखेडे सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.शुभम लंजे व टीम ने चांगल्यारीत्या पार पाडली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
भेटी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम लंजे व डॉ. स्नेहा बर्वे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश राठोड,औषध निर्माण अधिकारी राजेश चव्हाण, आरोग्य सहाय्यक पांडुरंग मडावी व सेवक मेश्राम, आरोग्य सहायिका सविता पटले,ओपीडी आरोग्य सेविका योगिता वावरे, स्टाफ नर्स शिवानी भोयर,आरोग्य सेविका संगीता झलके व न्यायमुर्ति, कनिष्ठ सहाय्यक अरुण उदापुरे, परिचर सुधाता बिबेकर, बबलु चव्हाण, दुर्गा मडावी व शिलाबाई टेंभुर्णे, स्वच्छक अनिल रामटेके उपस्थित होते.