
तिरोडा, बोदलकसा JJM प्रशिक्षणाचा समारोप
तिरोडा ता.24 डिसेंबर :-जलव्यवस्थापनासाठी आता पाणी मोजमाप यंत्र अर्थात मीटरची नितांत गरज आहे, त्यामुळेच पाण्याची बचतही होईल असे प्रतिपादन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता संजय कटरे यांनी केले.
तिरोडा,येथे आयोजित 3 दिवशीय प्रशिक्षणाचा समारोप थाटात झाला. या प्रसंगी श्री कटरे यांनी प्रवीण प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.जल जीवन मिशन अंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.दरम्यान तालुक्यातील बोदलकसा येथेही आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सेवानिवृत्त गट विकास अधिकारी एन. आर. जमईवार यांनीही प्रवीण प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. आर. खामकर यांच्या मार्गदर्शनात , आणि नागपूरच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभय बनसोड यांच्या नियंत्रणात आयोजित या प्रशिक्षणाची प्रशिक्षणार्थ्यांनी तोंड भरून प्रशंसा केली.प्राईमूव्ह संस्थेचे पर्यवेक्षक डॉ ए. सी. मुजावर यांच्या सुपरविजनमध्ये तिरोडा आणि बोदलकसाचे प्रशिक्षण झाल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना पाण्याचे गांभीर्य चांगलेच कळले.
तिरोडा येथे प्रवीण प्रशिक्षक संतोष परमार, पृथ्वीराज कोल्हटकर यांनी तर बोदलकसा येथे सेवा निवृत विस्तार अधिकारी श्री भुरे यांनी प्रशिक्षण दिले.इंदोरा खुर्द येथे प्रक्षेत्र भेट देऊन जलव्यवस्थापणाची प्रात्यक्षिक माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली.शासकीय योजनांचे अभिषरण, निधी कसा मिळविता येईल, नेतृत्व विकास कसा असावा आदि विषयांचा आजच्या प्रशिक्षणात समावेश करण्यात आला. दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांणा प्रमापत्राचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी अर्जुनी /मोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री राणे उपस्थित होते. समन्वयक मुकुंद गजभिये आणि श्री लोखंडे यांनी सहकार्य केलं.तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक, महिला बचत गटाचे, प्रतिनिधी, जलसूरक्षक आदींनी लाभ घेतला.