
तिरोडा:- तालुक्यातील वैंगगंगा नदीवरील धापेवाडा उपसा सिंचन योजना तिरोडा तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरली असून यामध्ये टप्पा क्र.१ चे पाणी २२ कि.मी.पाईपलाईनद्वारे खळबंदा जलशायात सन २०१९ पासून २२ गावातील लाभक्षेत्रातील शेतक-यांना देण्यात येत आहे. १०१४१ हेक्टर जमिनीला पाणी मिळत आहे. याबरोबरच टप्पा क्र.२ चे पाणी बोदलकसा, चोरखमारा या तलावात सोडण्याच्या कामाला २०१९ पासून सूर होते. ३ वर्षे कोव्हीड परीस्थितीमुळे कामे बंद होती त्यामुळे सदर योजना २०२१ ला सुरु होऊ शकली नाही. तिरोडा गोरेगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा करून टप्पा २ चे पाणी बोदलकसा चोरखमारा तलावात पाईपलाईनद्वारे सोडण्याच्या कामाला सुरुवात करवून घेतले.मुंबई हावडा रेल्वे लाईनमुळे अडथळा उद्भवला असता तातडीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांचेशी चर्चा करून मेगा ब्लाक मिळाला व सदर पाईपलाईन रेल्वे ट्रॅक खालून पुशिंग मशीनद्वारे पाईप टाकण्यात आले. जून २०२३ पर्यंत टप्पा क्र.२ च्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून सदर पंपाची तपासणी आमदार विजय रहांगडाले च्या हस्ते करण्यात आली. असून यशस्वीरित्या बोदलकसा व चोरखमारा तलावात सोडण्यात आले आहे. याबरोबरच धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ चरण ३ अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील गुमडोह व पांगडी जलशायात सोडण्याच्या कामाला येत्या वर्षात सुरुवात होणार असून सदर काम अंतिम मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्तावित करण्यात आले. धापेवाडा उपसासिंचन टप्पा क्र.२ मध्ये बोदलकसा तलावाकरिता २६०५ एच पी चे ३ पंप व चोरखमारा २८७५ चे २ पंप द्वारे ,पाणी सोडून बोदलकसा, चोरखमारा, रिसाळा, भदभदया व संग्रामपूर तलावद्वारे द्वारे ७६ गावातील २९५१२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतक-यांना लाभ मिळेल याबरोबरच निमगाव आंबेनाला लघु प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसात सुरु होणार असून याद्वारे लाभक्षेत्रातील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तिरोडा धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ व २ हि योजना तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत तिरोडा व गोंदिया तालुक्यातील शेतक-यांकरिता लाभदायी ठरली असून टप्पा क्र.२ चरण ३ चा लाभ गोरेगाव तालुक्यातील जनतेला लाभ देण्याचे नियोजित आहे. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात धापेवाडा उपसा सिंचन योजना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचे मोठे योगदान आहे. या पंप चाचणीच्या वेळी प्रामुख्याने कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले,उपसभापती भूमेश्वर रहांगडाले, प.स.सभापती कुंता पटले, मा.उपाध्यक्ष मदन पटले, जि.प.सदस्य चत्रभूज बिसेन, एड.माधुरी रहांगडाले, पवन पटले, तुमेश्वरी बघेले, रजनी कुंभरे, जगदीश बावनथडे, प.स.उपसभापती हुपराज जमाईवार ,सदस्य तेजराम चव्हाण,चेतलाल भगत, सुनंदा पटले, दिपाली टेंभेकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पालांदूरकर, मा.प.स.सदस्य ब्रिजलाल रहांगडाले, सरपंच इंदू पारधी, विधानसभा प्रमुख वंसत भगत,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहरअध्यक्ष स्वानंद पारधी, कृउबास संचालक रविन्द्र वहिले, सोशल मिडिया प्रमुख नितीन पराते, संजय पारधी, ओबीसी आघाडी अध्यक्ष डीलेश पारधी,शिवलाल परिहार,प्रकाश सोनकावडे, दलित आघाडी जिल्हासचिव दिगंबर ढोके धापेवाडा उपसा सिंचन योजना कार्यकरी अभियंता अंकुर कापसे, उपभीयंता पंकज गेडाम व यंत्रणेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.





