जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये चिचगड प्राथमिक शाळेने पटकाविला प्रथम क्रमांक

0
25

चिचगड,दि.३०- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात देवरी तालुक्यातील चिचगड येथील प्राथमिक मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम पुरस्कार पटकाविला.जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आले.देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा चिचगडच्या मुलांनी कबड्डीच्या सामन्यात प्रथम क्रमांक पटकाविला.सांघिक विविध वैयक्तिक स्पर्धेत देखील देवरी तालुका प्रथम क्रमांक घेऊन पुढे राहिला.प्राथमिक मुले उंच उडीमध्ये जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा चिचगडचा विद्यार्थी अंश दीपक भोयर यांने प्रथम क्रमांक पटकाविला.यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन गट शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे , मुख्याध्यापिका शारदा अंबादे,महेंद्र टेंभुर्णे, वर्षा टेंभुर्णे ,दीक्षांत धारगावे, केसव लोकनार ,प्रगती निखाडे सुभाशिनी सोनटक्के, मीना सूर्यवंशी, सरपंच व पोलीस पाटील पालक व तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पालक यांनी अभिनंदन केले.