42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता विजेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू

0
66

blank

गडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उच्छाद सुरू असताना एका रानटी हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा येथे उघडकीस आली. गावालगतच्या शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. त्यात कळपातील मादी हत्ती अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा परिसरात रानटी हत्तींचा कळप दाखल झाला. जंगलालगत असलेल्या एका शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. दरम्यान, कळपातील एका मादी हत्तीला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.कळपावर नजर ठेवणाऱ्या वनविभागाच्या ‘ड्रोन’ कॅमेऱ्यात दिसून आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून विजेचा प्रवाह सोडणाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देसाईगंज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे.

blank