भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डाॅ.फुके भाजपचे उमेदवार!

0
47
खेमेंद्र कटरे

गोंदिया,दि.05 जानेवारी-येत्या वर्षात एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचार मोहिमेला वेग दिलेला आहे.यात आपली उमेदवारी वाचविण्यासाठी विद्यमान खासदारांचा सुरु असलेला आटापिटा आणि माजी विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांचा कार्यक्रमांचा झंझावात बघता विद्यमान खासदारंना मागच्यावेळी लागलेली लाॅटरी यावेळी मागे पडली असून नागपूर जिल्हा निवासी माजी मंत्री डाॅ.परिणय फुके यांचे नाव पार्लेमेंटरी बोर्डाने जवळपास निश्चित केल्याचे वृत्त समोर आले आहे.

गेल्या काही दिवसापासून दोन्ही जिल्ह्यातील राजकीय हालचालीकडे बघितल्यास अचानक डाॅ.फुके हे सक्रिय झालेले आहेत.त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारींच्या आशेने भाजपमध्ये परत गेलेले विजय शिवणकर यांना मात्र लोकसभा मतदारसंंघाचा निवडणुक प्रमुख करुन त्यांच्या अपेक्षांना तिथेच पक्षाने गोठवले.तर विद्ममान खासदार सुनिल मेंढे यांना पक्षातूनच होत असलेला आंतरिक विरोध या सर्व बाबींकडे लक्ष दिल्यास मागच्या निवडणुकीत एैनवेळेवर फुंकेना वगळून मेंढेना मिळालेली तिकीट यावेळी मात्र त्यांच्या पदरात पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.त्याअनुषंगानेच की काय आज 5 जानेवारीला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील काही वर्षबघितल्यास यावर्षीसारखा उत्साह संपुर्ण लोकसभा मतदारसंंघात दिसून येत नव्हतो,तो जल्लोष…उत्साहा हा त्यांच्या उमेदवारीचे संकेत देणारे मानले जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेले डाॅ.परिणय फुके यांचे भंडारा गोंदिया विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आगमन झाले.आणि त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना मात देत आपल्या वैशिष्ट्यपुुर्ण शैलीने इतर नेत्यांना चित करीत दोन्ही जिल्ह्याचा राजकारणातील दादा होण्याचा मान माजी खासदार महादेवराव शिवणकर यांच्यानंतर प्राप्त केला हे कबूल करायची वेळ आली आहे.

आधी भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघापर्यंतच त्यांच्या कार्यक्रमाची रेलचेल होती,मात्र त्यानंतर शासनस्तरावरुन जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमत्रिंत सदस्याच्या यादीत दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या नावाना मागे ठेवत सर्वात आधी फुके यांचे नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आले होते. त्यानंतर दोन तीन महिन्यानी कुठे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील माजी आमदारांना संधी मिळाली.यावरुन पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन त्यांना तसे निर्देश देण्यात आले असून फुके यांनी आपल्या परिचित व जवळच्या मित्रमंडळींनाही आपले नाव निश्चित झाल्याचा संदेश अनेक बैठकांच्या माध्यमातून दिला आहे.त्यातच उद्या 5 जानेवारी दोन्ही जिल्ह्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचे नियोजन व होर्डिंगबाजीवरुन त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांनी खूप मागे टाकल्याचे दिसून येत आहे.त्यातच आपली खासदारकीची तिकिट वाचविण्याकरीता खा.मेंढे यांनीही आत्ता राममंदिराच्या निमित्ताने मतदारसंघात यात्रा काढली असली तरी त्या यात्रेऩेही त्यांचे पुनरागमन होईल अशी कुठेच चिन्ह दिसून येत नाही,भाजपचेच अनेक कार्यकर्त मेंढे नकोच असा सुर लावून बसलेत.

फुके हेच या मतदारसंघातील भाजप-सेना- पवार महायुतीचे उमेदवार राहणार असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यापध्दतीचे संदेश पोचते करण्यात आले आहेत.मात्र भाजपकडून अधिकृतरित्या नावाची घोषणा ही निवडणुकीच्या दरम्यानच करण्यात येणार असल्याने त्यावेळपर्यंतच्या बदलत्या राजकारणात काय होईल हे सुध्दा नकी सांगता येणारे नसले तरी सध्याच्या घडीला डाॅ.फुके हे 100 टक्के भाजपचे उमेदवार राहणार निश्चित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या पार्लेमेंटरी बोर्डाकडे महाराष्ट्र भाजपने डाॅ.परिणय फुके,खासदार सुनिल मेंढे,तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त आहे.त्यातच आमदार विजय रहागंडाले यांनी लोकसभेपेक्षा विधानसभा मतदारसंघावरच आपला हक्क कायम ठेवला आहे.भंडारा-गोंदिया मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी सतत लढत आल्याने प्रफुल पटेल सुध्दा निवडणुकीच्या एैनवेळेवर रिंगणात उतरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळी भाजप आपला उमेदवार मागे घेऊन पटेलांना समर्थन देऊ शकतो असा सुध्दा राजकीय अंदाज असला तरी प्रफुल पटेल हे कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढण्यास इच्छुक नसल्याचेही सुत्रांचे म्हणने आहे.त्यामुळे पटेलांचा नकार फुकेंकरीता होकार ठरणार आहे.