दांडेगाव येथील अपघातातील मृतकांना 10 व जखमींना 5 लाखाची मदत करा

0
15

जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी  काँग्रेसपक्षाकडून निवेदन सादर

गोंदिया,दि.05- तालुक्यातील दांडेगाव येथे 26 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12. 45 वाजेच्या सुमारास गोंदिया तिरोडा मुख्य रस्त्यावर झालेल्या टवेरा गाड़ीचा भीषण रस्ता अपघातात 5 लोकांचा मृत्यू झाला.या भीषण अपघातातील मृतकांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतगर्त 10 लाख रुपये व जखमींना 5 लाख रुपये मदत राशी देण्यात यावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून गोंदिया तालुका बुथ प्रमुख रविकुमार (बंटी) पटले यांच्या नेत्तृत्वात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना देण्यात आले.सदर निवेदनाची प्रत खासदार प्रफुलभाई पटेल, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम व माजी आमदार व जिल्हा नियोजन समिति सदर राजेंद्र जैन यांना देण्यात आलेली आहे.यावेळी करण टेकाम अध्यक्ष नेशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन जिल्हा गोंदिया, राजेशकुमार तायवाडे पत्रकार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र, रघुवीरसिंग उईके, आरिफ़ पठान, लोकेश नागभीरे व धनलाल नागभीरे उपस्थित होते.