प्रथम मुस्लिम शिक्षिका समाजसुधारक फातिमा शेख जयंती साजरी

0
22

गोंदिया:-:- फातिमा शेख या भारतातल्या प्रथम महिला शिक्षिका व समाज सुधारक म्हणून ओळखल्या जातात. ज्योतीराव व सावित्रीमाई फुले यांच्या सोबत सहकारी म्हणून शोषित पीडित मागासवर्ग समाजातील मुलामुलींना शिक्षित करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. त्याचप्रमाणे विषम परिस्थितीत फुले दाम्पत्यासोबत खंबीरपणे उभे राहून आपला घर शाळेकरिता उपलब्ध करून दिला. अशा या महान माई माऊलीला अभिवादन करण्यासाठी जिल्हा वासियानी तसेच विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी प्रभात टॉकीज जयस्तंभ चौक गोंदिया येथे एकच गर्दी केली होती. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित “सत्यशोधक” चित्रपट सुरू असलेल्या या चित्रपट गृह ठिकाणी सर्व समाजवर्गातर्फे एकत्र येऊन अभिवादन करण्यात आले तसेच महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रवर रेखाटलेला बोधपुर्ण चित्रपट उपस्थित सर्वांनी बघितला. या प्रसंगी सुदामा हायस्कूल नागरा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अभिवादन कार्यक्रमाला शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा कुडवाचे मुख्याध्यापक बी.वाय.फुले, एन.बी पारधी, व्ही.एस. मेश्राम, जी.बी.फड, जे.टी. बीसेन, पी.डी. कोल्हारे, एस. पी. दास, एम.जी. पैरामेडिकल महाविद्यालयाचे संचालक मनसर गोंडाणे, अनिल गोंडाणे, लील्हारे मॅडम, प्रीती वैद्य, ललित ढबले, प्रभात थिएटर व्यवस्थापक दीपक वेरुळकर, वामन कारंजेकर, युधिष्ठिर नायक, ठाकूर, लिखितकर, सामाजिक संघटनेचे करुणा कामत, इंदिरा मेश्राम, तक्षशिला गडपायले तसेच सत्यशोधक विचार मंच महिला मंडळ गिधाडी ग्राम, बुद्ध विहार मंडळ, विविध शाळा महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुदामा हायस्कूलचे शिक्षक एम. एस.राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार अतुल सतदेवे यांनी मानले.