
शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचं असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला (Sharad Pawar Symbol ) तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे.
संघर्षाची तुतारी !
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वरांच्या अन्यायाचा नायनाट करण्यासाठी स्वराज्याचे रणशिंग फुंकले.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, महाराष्ट्र धर्मावर दिल्लीतून पुन्हा एकदा आक्रमण झाले आहे, हे आक्रमण याच मातीत गाडून टाकण्यासाठी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड… pic.twitter.com/Q4eQTmx4dS— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 24, 2024
आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट हेच चिन्ह वापरणार आहे. तत्पूर्वी, चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन ऐतिहासिक अशा किल्ले रायगडावर चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं.
संघर्षाची तुतारी !
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वरांच्या अन्यायाचा नायनाट करण्यासाठी स्वराज्याचे रणशिंग फुंकले.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, महाराष्ट्र धर्मावर दिल्लीतून पुन्हा एकदा आक्रमण झाले आहे, हे आक्रमण याच मातीत गाडून टाकण्यासाठी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड… pic.twitter.com/Q4eQTmx4dS— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 24, 2024
“तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान”
“सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील”, असे शरद पवार (Sharad Pawar Symbol ) म्हणाले आहेत.
“निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी असून तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची मला खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया”, असे आवाहन देखील यावेळी शरद पवार यांनी केलं आहे.
“दिल्लीश्वरांच्या अन्यायाचा नायनाट करण्यासाठी..”
यावेळी शरद पवार गटातील (Sharad Pawar Symbol ) अनेक नेत्यांची उपस्थिती होती.खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, “तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. शरद पवार यांच्या हातून या चिन्हाचं अनावरण रायगडाच्या त्या पवित्र भूमीत झालंय. ज्या पवित्र भूमीतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ग्वाही ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपानं जगभर पसरली होती… ”
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वरांच्या अन्यायाचा नायनाट करण्यासाठी स्वराज्याचे रणशिंग फुंकले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, महाराष्ट्र धर्मावर दिल्लीतून पुन्हा एकदा आक्रमण झाले आहे, हे आक्रमण याच मातीत गाडून टाकण्यासाठी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथून पवार साहेबांच्या नेतृत्वात आज पुन्हा एकदा संघर्षाचे रणशिंग फुंकत आहोत, असंही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.