
अर्जुनी मोर.-तालुक्यातील बोंडगावदेवी ३३| ११ के.व्ही.उपकेंद्रांतुन निघणा-या ११ केव्ही सिलेझरी वाहीणीचे विभाजन करण्याचे कामाचे भुमीपुजन उपविभागीय अभियंता अमित शहारे यांचे हस्ते ता.१ मार्च रोजी करण्यात आले. सध्या बोंडगावदेवी ३३|११ केव्ही विज उपकेंद्रांतुन सिलेझरी, घुसोबाटोला, चान्ना, बाकटी, विहिरगाव, बोंडगावदेवी, सोनेगाव, देऊळगाव, बोदरा, आदी गावांना खाजगी घरगुती वापरासह शेतीलाही विज पुरवठा केला जातो.त्यामुळे सिलेझरी कृषी वाहिणी अती भारीत झाल्यामुळे सदर वाहिणी वारंवार बंद पडने, तार तुटने अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. हि समस्या लक्षात घेता. उपविभागीय अभियंता अमित शहारे यांनी सदर उपकेंद्रांतुन दोन वाहिण्या ( डबल फिडर ) तयार व्हावे असा प्रस्ताव शासनस्तरावर सादर केला होता.या विभागाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी विशेष प्रयत्न करुन हा प्रस्ताव मंजुर केल्याने सदर काम आर.डी.एस.एस.योजनेंतर्गत मंजुर होवुन आज त्या कामाचे भुमीपुजन होवुन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे सिलेझरी वाहिणी अंतर्गत पाच गावाची विज समस्या दुर होईल असी आशा व्यक्त केली जात आहे.