33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home मराठवाडा/खान्देश सीईओंच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेत सदस्यांनी शिंपडले गोमूत्र

सीईओंच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेत सदस्यांनी शिंपडले गोमूत्र

0
720

blank

धुळे : धुळे जिल्हा परिषद सीईओ शुभम गुप्ता यांच्या बदलीचे आदेश १९ मार्च रात्री उशिराने काढण्यात आले. त्याची जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाली असून सीईओ गुप्ता यांच्या बदलीनंतर सदस्यांनी जिल्हा परिषद परिसरात गोमूत्र शिंपडले. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. गेल्या काही दिवसांपासून  धुळे जिल्हा परिषदेचे सिईओ शुभम गुप्ता यांच्यावर सत्ताधारी व विरोधकांतर्फे वारंवार विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचा आरोप लावला गेला. सीईओतर्फे  मनमानी कारभार सुरू असल्याचा देखील आरोप वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांतर्फे लावण्यात येत होता. त्यानंतर १३ मार्चला  जिल्हा परिषदेचे सिईओं यांच्या विरोधात अविश्वास ठरावा करण्यात आला. या नंतर बदली झाली आहे.जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांच्यावर जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी मागील आठवड्यात अविश्वास ठराव आणल्यानंतर शुभम गुप्ता यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.

blank