पंचायत विकास सूचकांक यादी जाहीर;वाशिम जिल्हा परिषद राज्यात अव्वल

0
3

वाशिम : पंचायत विकास (Panchayat Development) सूचकांकमध्ये ९९ टक्के गुण प्राप्त करुन,वाशिम जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली आहे़. जिल्हा परिषद निर्मितीनंतर प्रथमत:च हा बहुमान प्राप्त होत असल्याने संबंधित अधिकारी -कर्मचार्‍यांचे कौतुक केले जात आहे़. शासनाच्या विविध विकास योजना जिल्हा परिषदमार्फत ग्राम पातळीवर राबविल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य व इतर विकास योजनांचा समावेश आहे़. राबविलेल्या विकास योजनांची माहिती वेळेत जिल्हा व राज्यस्तरावर पाठविण्याची जबाबदारी ही संबंधित कर्मचारी व अधिकारी यांची असते़. यामध्ये (Washim Zilla Parishad) वाशिम जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांनी चोख अंमलबजावणी करुन पी. डी. आय. मध्ये वाशिम जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली आहे़.

सांगली जिल्हा परिषद दुसर्‍या क्रमांकावर असून, अहमदनगर जिल्हा परिषद  तिसर्‍या स्थानावर आहे़. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले योग्य नियोजन व जिल्ह्यातील पंचायत समिती गटकविकास अधिकारी, तसेच संबंधित कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे हे यश संपादन झाले, असे बोलले जात आहे़.