33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ “ड” यादीत नाव नाही ? चिंता नको आता ग्रामसभा गरजूंना देणार प्राधान्य

“ड” यादीत नाव नाही ? चिंता नको आता ग्रामसभा गरजूंना देणार प्राधान्य

0
339

blank

*घरकुल करिता वाढवून मिळणार ओबीसी एसबिसी आणि एनटी प्रवर्गाचा लक्षांक*

*जातीच्या प्रवर्गानुसार लक्षांक ठरविण्याचा निर्णय ग्राम सभेला*

*आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश*

गोंदिया -ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांच्या सर्वात जिव्हाळ्याच्या विषय म्हणजेच घरकुल. यासाठी केंद्रशासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजना आणि विभागांच्या माध्यमातून नागरिकांना पक्के घर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. प्रत्येक घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जातीच्या प्रवर्गानुसार घरकुलाचा लक्षांक निर्धारित केला जातो. परंतु प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या जाती प्रवर्गाची लोकसंख्या वेगवेगळी असल्याने एका विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेला लक्षांक वापरला जात नसून इतर जाती प्रवर्गाची संख्या जास्त असल्याने त्या जाती प्रवर्गातील नागरिकांना पुरेपूर लाभ मिळत नाही. अशा विविध समस्या जाणून आमदार विनोद अग्रवाल यांनी शासन दरबारी मांडल्या. त्यावर शासनाने आता सकारात्मक निर्णय घेतला असून शासन निर्णयाच्या माध्यमातून यापुढील ओबीसी, एसबीसी आणि एनटी प्रवर्गातील घरकुलांचा लक्षांक ग्रामपंचायतींना ग्रामसभेत घेऊन निश्चित करण्यासाठी मुभा दिली आहे. याशिवाय प्रलंबित “ड” यादी मध्ये नाव समावेश नसला तरी सुद्धा आता ग्रामसभेच्या माध्यमातून अति गरजूंना तातडीने घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे. गरजू अति गरजू यांना प्राधान्य देण्यासाठी यादीमध्ये बदल करण्याच्या सुद्धा अधिकार ग्राम सभेला प्रदान करण्यात आला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यासाठी ओबीसी, एसबीसी आणि एनटी प्रवर्गातील नागरिकांसाठी लक्षांक वाढवून मिळालेला असल्याने आता लवकरच या प्रवर्गातील प्रलंबित यादी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यापुढे ग्रामपंचायती त्यांच्या क्षेत्रातील लोकसंख्येचे अंदाज बांधून जातीय प्रवर्गातील नागरिकांना लाभ घरकुलाचे मिळवून देण्यासाठी सक्षम ठरणार आहे. खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत स्वायत संस्था असल्याचे यावरून ग्रामपंचायतींना बळ मिळणार आहे.

यासंबंधीचे शासन निर्णय सुद्धा शासनाकडून प्रकाशित केले गेले आहे. या अभूतपूर्व निर्णयासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी सलग पाठपुरावा करून प्रयत्न केल्याने त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश प्राप्त झालेले आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार व सहकार मंत्री अतुल सावे यांचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आभार व्यक्त केले आहे.