लहान भावाने केली मोठया भावाची हत्या, इर्री येथील घटना

0
344
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया : घरगुती झालेल्या छुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारच्या रात्री (ता.19) गोंदिया तालुक्यांतील इर्री येथे घडली असून हरिराज प्रेमलाल मेंढे वय 33 असे मृतकाचे नाव असून मुन्ना प्रेमलाल मेंढे वय 27असे मारणाऱ्या लहान भावाचे नाव आहे.
बुधवारच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास संपतीच्या वादातून दोन्हीं भावात वाद सुरु होता. अश्यात वाद विकोपाला गेल्याने लहन भाऊ मुन्ना याने मोठ्या भावाच्या डोक्यावर उभारीच्या दांड्याने वार केले. जखम मोठी असल्याने तत्काळ जख्मी अवसस्थेत हरिराज याला नागपुर येथे हलविण्यात आले. उपचार सुरु असतानाच हरिराज यांचा गुरुवारी सकाळी प्राण ज्योत मालवली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असुन आरोपी मुन्ना मेंढे यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक काळे करीत आहेत.