क्रुड ऑईलची चोरी करणारी टोळी गजाआड

0
76

गोंदिया : टँकरचे बनावट कागदपत्रे, नंबर प्लेट तयार करून तालुक्यातील अर्जुनी येथील पारिजात ऑइल मिलमधून 3227 किलोग’ॅम राइस ब’ांड क’ुड आइलची अफरातफर करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा रावणवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेत 26,115 किलोग’ॅम राइस ब’ँड क’ुड ऑइल व टँकर असा 50 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी गुरमितसिंग मसासिंग भु’र (36, रा. डिलाराम ता. जि. फिरोजपूर, पंजाब) सध्या रा. पारिजात ऑइल मिल कॅम्पाउंड, अर्जुनी यांनी 19 जानेवारी 2024 रोजी रावणवाडी पोलिसात दिलेल्या तक’ारीनुसार, 28 डिसेंबर 2023 रोजी दुपारी तीनच्या सुमारास राहुल टँकर सर्विस रायपूर (छत्तीसगढ) मालक योगेश विमलदेव ठाकूर यांच्याद्वारा पाठविलेला टँकरचालक सुनीलकुमार ब’ह्मानंद मिश्रासोबत आरोपींनी संगणमत केले. त्यानंतर त्यांच्या पारिजात ऑइल मिलमधून 23,71, 845 रुपये किमतीचा 3227 क्विंटल राइस ब’ँड क’ुड ऑइल साल्वेन्ट प्रा. लि. कंपनी मुरैना, मध्य प्रदेश येथे न पोहोचवता अफरातफर केली. दरम्यान, गुरमितसिंग भु’र यांच्या तक’ारीवरून रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने तपास केला. आरोपी गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसानी गुजरातला जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी टँकर क’मांक जीजे 12 एझेड 2295 या क’मांकाची नंबर प्लेट बदलून त्यावर दुसर्‍या क’मांकाची नंबर प्लेट लावली. तसेच त्या क’मांकाचे खोटे कागदपत्रे तयार करून आरोपी चालक महेंद्रकुमार हरगोवनभाई मकवाना याचे सुनीलकुमार ब’ह्मानंद मिश्रा नावाने खोटे ड्रायव्हिंग लायसन्स बनवून गुन्हा करण्याचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपींच्या ताब्यातून 30 लाख रुपयांचा टँकर जप्त केला. त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपींनी अफरातफर केलेला राइस ब’ँड क’ुड आइल आरोपी मुकेश विठ्ठलभाई चौवाटीया (47, रा. 115, शांतीनगर, ता. अंजार, जि. कच्छभुज, गुजरात), मधूभाई भिकाबाई चौवाटीया (60, रा. जांझर्डा रोड, गोपालधाम सोसायटी, जुनागड, जि. जुनागड गुजरात) यांना विक’ी केल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेत 20 लाख 90 हजार रुपये किमतीचा 26,115 किलोग’ॅम राइस ब’ँड क’ुड आइल व टँकर असा 50 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी विविध राज्यात अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांत कोट्यवधींचे मस्टर्ड आइल, राईचे आइल व राइस ब’ँड क’ुड ऑइलची अफरातफर केली आहे.

इतर आरोपींमध्ये यांचा समावेश

लक्की राजसिंग घेमेंद्रसिंग जडेजा (36, रा. वर्षामेडी ता. अंजार कच्छ, गुजरात), राजेश अशोकभाई लिंबाचिया (28, रा. भारतनगर, गांधीधाम कच्छ, गुजरात), महेंद्रकुमार हरगोवनभाई मकवाना (43, रा. कमालपूर, ता. राधनपूर जि. पाटन, गुजरात), कल्याण ताताराव सौरभ (28, रा. आदीपूर कच्छ, गुजरात), संजय हजारीलाल मावर (36, रा. कच्छ, गुजरात), अशी अन्य आरोपींची नावे आहेत.