मतदानाच्या प्रतिज्ञेची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकार्डस्’मध्ये नोंद

0
80
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया, दि.24 : भारत निवडणूक आयोगाच्या 16 मार्च 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार संपुर्ण देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता, त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान (पहिला टप्पा) घेण्यात आले होते.

         लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी ‘आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु’ याबाबत SVEEP Cell District Election Officer, Gondia यांचेामार्फत 5 एप्रिल 2024 रोजी संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील विविध ठिकाणी 12 तासात जास्तीत जास्त मतदारांनी भाग घेवून मतदानाबाबतची प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यात गोंदिया जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 187 मतदारांनी एकाच वेळेस प्रतिज्ञा घेण्याबाबतची नोंद International Book of Records मध्ये घेण्यात आली असून International Book of Records यांचेमार्फत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांना तसे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

         जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सदरचे यश संपादनाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी एम. मुरुगानंथम, शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे सहायक नोडल अधिकारी महेंद्र गजभिये, पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता तथा स्वीपच्या सहायक नोडल अधिकारी शिखा पिपलेवार व त्यांचे चमूतील सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये देखील मतदारांना मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येईल व मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.