अर्जुनी मोरगाव – तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा खांबी/पिंपळगांव येथे राजश्री शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच निरुपाताई बोरकर, पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम, सार्वजनिक बांधकाम ठेकेदार पुरुषोत्तम डोये, गोपाळा शिवणकर, ग्रा.पं सदस्या ममता मेश्राम, शाळेचे मुख्याध्यापक काळसर्पे, शिक्षक ऊके, बावणे, काशिवार मॅडम व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज याची आज जयंती. शाहू महाराजांनी राजा असूनही आपल्या राज्यकारभारात शोषित, पीडित, वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह धरला. किंबहुना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, आरक्षण, शाळा, वसतिगृहे उभारण्याला प्राधान्य दिले. भेदाभेद नष्ट व्हावा यासाठी समाजिक सुधारणा घडवून आणली. त्यामुळेच आजचा दिवस हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणूनही साजरा केला जातो असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.