40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ विद्युत खांबावर चढलेल्या युवकाचा करंटने मृत्यू

विद्युत खांबावर चढलेल्या युवकाचा करंटने मृत्यू

0
427

blank

गोंदिया : तालुक्यातील दासगाव येथील नितेश नरेश बिसेन (२७) या तरूणाला करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बुधवारी (दि.२६) रोजी दुपारी घडली. विद्युत करंट लागल्याने नितेश विद्युत खांबावरून खाली पडल्याने त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील नितेश बिसेन यांच्या घरी गेल्या चार दिवसांपासून शॉटसर्कीटमुळे विद्युत पुरवठा खंडीत होता. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बिसेन कुटुंबियांनी विद्युत वितरण कंपनीला केली होती. बुधवारी लाईनमन संतोष तरोणे याने आपल्या कामासाठी गावातील नितेश बिसेन (२७) या तरुणाला वीज सुरु असलेल्या खांबावर चढवून काम करून घेत होता. दरम्यान विद्युत धक्का लागल्याने नितेश बिसेन यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतक तरुणाच्या नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला. याची माहिती पोलीस विभागाला दिली असता याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात लाइनमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.