
गोंदिया, दि.27 : क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया मार्फत सन 2024-25 या सत्रात 15 वर्ष मुले व 17 वर्ष वयोगट मुला-मुलींसाठी 5 ते 6 जुलै 2024 या कालावधीत जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा-महाविद्यालयांनी 4 जुलै 2024 पर्यंत आपल्या संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत करावी. यास्पर्धेत 14 वर्ष मुले वयोगटासाठी 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतरचा जन्म असावा. तसेच 17 वर्ष मुले/मुली वयोगटासाठी 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतरचा जन्म असावा.
जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी सदर क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरीता www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.