38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या विषयावर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवहरे भेटले समाजकल्याण उपायुक्तांना

ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या विषयावर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवहरे भेटले समाजकल्याण उपायुक्तांना

0
185

blank

 गोंदिया ः इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे ७२ वसतिगृहे सुरू केले जातील, अशी घोषणा सरकारमार्फत करण्यात आली होती.त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात या शैक्षणिक सत्रापासून वसतिगृह सुरु करुन ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता अर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे या विषयासह सावित्रीबाई फुले आधार योजनेतंर्गत ज्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे,परंंतु सुट्टीनिमित्त आपल्या गावी आलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक जिल्ह्यात अर्ज उपलब्ध करुन देण्याच्या मुद्यावर गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज इतर मागास बहुजन विभागाचे संचालक व समाजकल्याण उपायुक्त यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने समाजकल्याण उपायुक्त विनोद मोहतुरे यांची भेट घेत चर्चा केली.यावेळी मोहतुरे यांनी शिवहरे यांना येत्या २ आठवड्यात वसतिगृहाला लागणार साहित्य उपलब्ध होणार असल्याची ग्वाही दिली.तसेच गोंदियातील जे विद्यार्थी इतर जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत,परंतु सुट्टीनिमित्त गावाकडे आलेत,त्या ओबीसी विद्यार्थ्यांना आधार योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्ज गोंंदियातून उपलब्ध करुन देण्याचेही आश्वासन दिले. शिष्टमंडळात शिवहरे यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख गोलू डहारे,जितेंद्र(पिंटु)बावनकर,गोंंदिया तालुका प्रमुख कुलदिप रिनायत,शहर प्रमुख बापी लांजेवार उपस्थित होते.

blank