परिणय फुकेसह,पंकजा मुंडे सदाभाऊ खोतांना विधानपरिषदेवर संधी, भाजपकडून पाच नावं जाहीर

0
387

मुंबई: राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक व कुणबी समाजातील विदर्भातील नेते डाॅ.परिणय फुके यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडें,सदाभाऊ खोत,अमित गोरखे आणि योगेश टिळेकरच्या नावाचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी? 

पंकजा मुंडे

योगेश टिळेकर

परिणय फुके

अमित गोरखे

सदाभाऊ खोत

पंकजा मुंडे कायद्याच्या सभागृहात असायला हव्या, दान नको, तो आमचा हक्क : लक्ष्मण हाके

ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या लक्ष्मण हाके यांनीही पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळायला हवी, असे वक्तव्य केले होते. पंकजा मुंडे या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी आम्हाला कोणीही दान म्हणून ते करू नका, भूतदया दाखवू नका, तो आमचा हक्क आहे. इथल्या तरुणांच्या त्या भावना आहेत. आमचा ओबीसी जसा-जसा बाहेर येईल, एकत्र येईल, तसा- तसा महाराष्टाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सर्व गोष्टींचा प्रभाव पडेल, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते.

तर विदर्भात डाॅ.परिणय फुके स्वतःला ओबीसी नेतेही म्हणवून घेत असून नागपूरातील एका ओबीसी संघटनेसोबत जोडले असल्याने विदर्भात आपणच भाजपचे ओबीसी नेते असल्याचे त्यांचा सुर असतो.